बॉम्बस्फोटातील चार आरोपींना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |
1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून नुकतंच चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपी मागील 29 वर्षांपासून फरार होते. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते. दोन दशकाहून अधिक काळापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. आरोपी अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता.

Exit mobile version