साळोख मारहाणप्रकरणी चौघे अटकेत

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील साळोख गावातील तरुणाने गोहत्याबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी चार जणांना पनवेल तळोजा येथून ताब्यात घेतले आहे, तर अन्य आरोपी अद्याप फरारी आहेत. गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी करताना आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पनवेल येथील तळोजा भागात लपून बसलेले चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून ते तीन आरोपी पोलीस कोठडीत आहेत,तर एक आरोपी हा 18 वर्षापेक्षा कमी वयाचे दिसून येत असल्याने त्याचे आधार कार्ड आणि जन्म दाखला न्यायालयाने मागवले असून ते तपासून पुढील आदेश न्यायालय काढणार आहे.तर या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी अद्याप फरारी असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.मारहाण प्रकरण घडल्यापासून ते तरुण साळोख गावातून गायब आहेत.

Exit mobile version