संतोष परब हल्ला प्रकरणी चार हल्लेखोरांना कोठडी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या चारही संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. चौघेही पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. या चौघांना न्यायालयाने गुरुवारी (ता.23 )पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संशयितांची नावे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला असून, मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे. हा मुख्य सूत्रधार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे पोलिस तपासात उजेडात आले आहे.
कणकवली रेल्वे स्थानकालगत नरडवे रस्त्यावर सकाळच्या सुमारास संतोष परब यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यानंतर संशयित मोटारचालकाला फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी त्याची चौकशी केल्यानंतर सायंकाळी येथील पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता.

Exit mobile version