विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

अमरावती | प्रतिनिधी |
माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुर्देवी घटना घडली. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचार्‍यांना शॉक लागल्याने या कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला. अमरावतीत प्रवीण पोटे यांचं पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची रंगरंगोटी करत होते. या गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे. हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. त्यानंतर जोराचा झटका बसल्याने हे चारही कर्मचारी खाली कोसळले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Exit mobile version