। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाभलेवाडीत शनिवारी (दि. 22) वणवा लागला. हा वणवा भडकत गेला आणि या वणव्यात जाभलेवाडीतील चार घरे जळून बेचिराख झाली. सुदैवाने तिथे जीवितहानी झाली नाही कारण उन्हाळा सुरू झाला की जाभलेवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष होते. गावात पाणी नसल्याने जवळच्या पाणवठ्याजवळ ही कुटुंब स्थलांतरित होतात. अशीच ही चार कुटुंब पाण्यासाठी स्थलांतरित झाली होती. मात्र, त्यांच्या घरात वस्तू तशाच होत्या. वणवा लागल्यानंतर विझवायला गावात पाणी नव्हते. त्यामुळे तो वणवा भडकत गेला आणि आगीत चार घरे जळून खाक झाली.