। फुकेत । वृत्तसंस्था ।
भारतीय बॉक्सर मोनिका, आशिषकुमार, गोविंद साहनी आणि वरिंदरसिंग यांनी थायलंड ओपनची अंतिम फेरी गाठली. 26 वर्षीय मोनिकाने 48 किलो वजन गटात व्हिएतनामच्या थी डिएम किऊचा पराभव केला. गतविजेत्या आशिषने 75 किलोत इंडोनेशियाच्या मायखेल मुस्किताला 5-0 ने हरवले आणि 48 किलोमध्ये गोविंदने व्हिएतनामच्या गुयेन लिन्ह फुंगचा 4-1 असा पराभव केला. 60 किलोमध्ये वरिंदरला फिलिपाइन्सच्या अब्दुल रहमानविरुद्ध पुढे चाल मिळाली.
थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत मोनिकासह चार भारतीयांची फायनलमध्ये धडक
