तळोजा पोलिसांचा केला सत्कार
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल मुब्रा रस्त्यावर तळोजा रेल्वे स्टेशन जवळ कंटेनरने स्कुटीला धडक देवून अपघात झाला त्यात पती पत्नी जागीच ठार झाली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी किशोर कर्डिले व रामदास पाटील यांना स्कूटीमध्ये सापडलेले चार लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते सपूर्त करण्यात आले. यावेळी उपायुक्त पाटील व पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या हस्ते किशोर कर्डिले व मनोहर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक 12 मे रोजी मूब्रा वरून तळोजा फेज 1 येथे खलिल अहमद शेख ( वय 65 ) व त्यांच्या पत्नी फरहत खलील शेख (वय 60 ) आपल्या घरी तळोजा फेज 1 येथे येत असताना तळोजा रेल्वे स्टेशन जवळ आली असताना त्यांच्या स्कूटीचा तोल गेल्याने ती दोघे पती पत्नी कंटेनरच्या चाकाखाली गेल्याने पत्नी फरहत शेख या जागीच ठार झाल्या तर खलील शेख यांना कामोठे एमजीएम येथे उपचारासाठी घेवून जात असताना मृत्यू झाला. यावेळी पोलिस कर्मचारी कर्डिले व पाटील यांना त्यांच्या स्कूटीमध्ये चार लाख व महत्वाची कागद पत्रे आढळून आली. त्यांना सापडलेल्या कागद पत्राच्या आधारे खलील यांच्या नातेवाईकांचा शोध लावून पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते चार लाख व महत्त्वाची कागद पत्रे त्यांना सपुर्त करण्यात आली. तर उपायुक्त पाटील यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी किशोर कर्डिले व पाटील यांचा गौरविण्यात आले.