| पनवेल | वार्ताहर |
स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी चार लाख 85 हजार रुपये घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेहा चव्हाण यु ट्यूबवर स्टॉक एक्सचेंजबाबत माहिती घेत असताना त्यांना एक लिंकद्वारे 11 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर चार लाख 38 हजार रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आले. गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल केला.