ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील चार लाख रुपये लंपास

। पनवेल । वार्ताहर ।

ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील चार लाख रुपये खेचून दोघे जण दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात 11 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. सुबोधचंद्र मायाराम कलीता हे खारघर, सेक्टर 20 येथे राहत असून, त्यांनी बँकेतून चार लाख रुपये फंडाची रक्कम काढली होती. ती रक्कम प्लास्टिकच्या बॅगमधून घेऊन ते घराकडे पायी जात होते. सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी खेचून पळून गेले.

Exit mobile version