। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पूर्व मंगलराघो नगर चिकणीपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. श्री सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.
कल्याणमधील चिकणीपाडा परिसरातील चार मजली सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून यातील चौघांचा मृत्यू झाला. तर इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. अजूनही काही लोक ढिगाराखाली अडकल्याची शक्यता असल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मोठी दुर्घटना! कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606