दोघांचे शोधकार्य सुरू
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील साजे येथे रवाळजे कुंडलिका नदीत चार जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेत दोन जणांचे मृतदेह पोलिसांना भेटले असून दोन जणांचे शोधकार्य सुरू आहे.
शनिवारी (दि. 07) साजे येथे एकाच कुटुंबातील 10 ते 12 जण नदीवर कपडे धुवायला गेले होते. त्यावेळी एक जण पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी तीन जण उतरले असता ते तिघेही नदीत पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरु केले.
यामध्ये सिद्धेश सोनार (21), काजल सोनार (26), सिद्धी पेडेकर (16), सोनी सोनार (27) यांचा समावेश असून सिद्धेश सोनार व सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह सापडले. उर्वरित दोन तरुणी बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे.