स्पेसएक्सकडून पुन्हा चार प्रवासी अंतराळात

On May 30, 2020, the SpaceX Falcon 9 Crew Dragon capsule lifts off from Kennedy Space Center, Fla. On Saturday, June 13, 2020, SpaceX launched yet another batch of Starlink satellites, continuing the companys mission to build a constellation of satellites that can deliver high-speed internet to the entire planet. (Joe Burbank/Orlando Sentinel/Tribune News Service via Getty Images)

। अमेरिका । वृत्तसंस्था ।
एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने गुरुवारी पुन्हा एक अंतराळ यान अवकाशात पाठवलं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासासोबत मिळून चार अंतराळ प्रवाशांना घेऊन जाणार्‍या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे यशस्वीरित्या लाँचिंग करण्यात आले आहे. या अंतराळ यानात चार प्रवासी आहेत. मात्र, या अंतराळयानाने पृथ्वीची कक्षा पार करताच 60 वर्षांच्या इतिहासात 600 लोकांना अंतराळामध्ये घेऊन जाण्याचा एक अनोखा रेकॉर्ड बनला आहे. थोडक्यात, आतापर्यंत 600 लोक अंतराळात जाऊन आल्याचा हा रेकॉर्ड आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीचे मथायस माउरर हे अंतराळात जाणारे 600 वे व्यक्ती असणार आहेत. त्यांच्यासोबत तीन सदस्य 24 तासांच्या आतच स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहेत. नासा-स्पेसएक्सचे हे मिशन खराब हवामानाच्या कारणामुळे जवळपास एक आठवडा उशीरा लाँच झाले आहे.

Exit mobile version