रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

| रायगड | प्रतिनिधी |

रामराज विभाग प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या दहा सामन्यांमधून चार संघ सुपर आठमध्ये दाखल झाले आहेत. या संघांमध्ये फरिहा इलेव्हन रामराज मोहल्ला, आई जाखमाता दिवी पारंगी, अर्णव इलेव्हन भोनंग आणि एम झेड सप्लायर्स उमटे या संघांचा समावेश आहे. हे चारहि संघ पहिल्या दिवशी सुपर आठमध्ये पोहचलेल्या संघांबरोबर भिडणार आहेत. उपउपांत्य फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असा या स्पर्धेतील सात सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. या पुढील सामने बॅड फेरीतील असणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीतील पहिला सामना फरीहा इलेव्हन रामराज मोहल्ला आणि छोटू इलेव्हन दिवी पारंगी या संघांमध्ये झाला. हा सामना फरीहा इलेव्हन रामराज मोहल्ला या संघाने जिंकला. दुसरा सामना जेपी फायटर्स सुडकोली आणि आई जाखमाता दिवी पारंगी या संघांमध्ये झाला. या सामन्यात जेपी फायटर्स सुडकोली या संघाने बाजी मारली. तिसरा सामना श्लोक 11 धावीर महान आणि अर्णव 11 भोनंग या संघांमध्ये झाला. या सामन्यात अर्णव 11 भोनंग संघ विजयी झाला. तर, चौथा सामना साईश्री प्रणय 11 नांगरवाडी आणि एमझेड सप्लायर्स उमटे या संघांमध्ये झाला. या सामन्यात एमझेड सप्लायर्स उमटे विजयी झाला.

दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना फरीहा इलेव्हन रामराज मोहल्ला विरुद्ध आई जाखमाता दिवी पारंगी यांच्यात झाला. या सामन्यामध्ये आई जाखमाता दिवी पारंगी या संघाने विजय मिळवला. दुसरा सामना अर्णव 11 भोनंग आणि एमझेड सप्लायर्स उमटे या संघांमध्ये झाला. या सामन्यात एमझेड सप्लायर्स उमटे या संघाने विजय मिळवला. तिसरा सामना छोटू इलेव्हन दिवी पारंगी आणि जेपी फायटर्स सुडकोली यान संघांमध्ये झाला. या सामन्यात छोटू इलेव्हन दिवी पारंगी हा संघ विजयी झाला. चौथा सामना श्लोक 11 धावीर महान आणि साईश्री प्रणय 11 नांगरवाडी या संघांमध्ये झाला. या सामन्यात श्लोक 11 धावीर महान हा संघ विजयी झाला. पाचवा सामना फरीहा इलेव्हन रामराज मोहल्ला विरुद्ध छोटू इलेव्हन दिवी पारंगी या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात फरीहा इलेव्हन रामराज मोहल्ला संघ विजयी झाला. दुसऱ्या दिवसातील शेवटचा म्हणजेच सहावा सामना श्लोक 11 धावीर महान आणि अर्णव 11 भोनंग या संघांमध्ये झाला. या सामन्यात अर्णव 11 भोनंग या संघाने विजय मिळवत उपउपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

Exit mobile version