महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये नाराजी
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड एसटी स्थानकात एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ऑनलाइन बुकिंग करून वातानुकूलित शिवशाही बसचे तिकीट घेतलेल्या प्रवाशांना ऐनवेळी साधी व जुनी एसटी लावण्यात आली. त्यामुळे, वातानुकूलित शिवशाहीची बुकिंग असूनही साधी बस दिली जाते.शिवशाहीचे पैसे भरून आम्ही जुन्या एसटीत का बसायचे? असा सवाल प्रवाशांनी एसटी प्रशासनाला केला. तसेच, ऑनलाइन बुकिंगचे पैसे रिफंडही होत नसल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे महाड एसटी स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमचे तिकिटाचे पैसे आम्हाला परत करा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. महाड आगारातून वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाचे व्यवस्थापक रीतेश फुलपगारे यांच्या विरोधात प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
