। पनवेल । प्रतिनिधी ।
एटीएम कार्डाची अदलाबदली करून त्याद्वारे 53 हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.23) गुन्हा दाखल करण्यात आला.
उषा राजभर या खिडूकपाडा येथे राहत असून, त्या त्यांच्या आईचे एटीएम कार्ड घेऊन डी- मार्टच्या बाजूला कळंबोली येथे पैसे काढण्यासाठी गेलया. पैसे काढत असताना एक व्यक्ती आतमध्ये आला आणि मला पैसे काढायचे आहेत, तुम्ही लवकर पैसे काढा असे बोलला. यावेळी त्याने राजभर यांचा एटीएम पिन पाहिला. पैसे काढत असताना त्या व्यक्तीने कार्ड काढून त्यांच्याकडे दिले. यावेळी त्या व्यक्तीने त्याच्याकडील एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकून काहीतरी चेक करून तो निघून गेला. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मोबाईल मध्ये 53 हजार रुपये वेगवेगळे एटीएम मधून पैसे काढण्याचे मेसेज आले. यावेळी त्या व्यक्तीने हातचलाखीने एटीएम चेंज करून दुसरे एटीएम कार्ड दिल्याचे त्यांच्या लक्षात आले.
एटीएम कार्डाची अदलाबदली करून फसवणूक
