। पनवेल । प्रतिनिधी ।
शेअर्स ट्रेंडिंग मध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राकेश कुर्मी हे नवीन पनवेल, सेक्टर सहा येथे राहत असून, त्यांनी टेलिग्राम मध्ये जाहिरात लिंक पाहिली. यावेळी शेअर मार्केटमध्ये भरघोस नफा देण्याबाबत दर्शवण्यात आले होते. त्यांनी लिंक वर क्लिक केले असता ते व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाले. यावेळी ग्रुप वर नफ्याबाबत माहिती दिली जात होती. राकेश यांनी पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक केल्याने त्यांना नफा होत होता. त्यामुळे त्यांनी अधिक पैशांचे गुंतवणूक केली आणि शेअर्स विकत घेतले. त्यांनी एक कोटी पन्नास हजार रुपये भरल्यानंतर वेगवेगळे आयपीओ देण्यात आले आणि नवीन आयपीओ विकत घेतल्यानंतरच त्यांच्या खात्यात रक्कम देण्यात येत होती. त्यांची रक्कम अगोदर घेतलेला आयपीओ मध्ये गुंतून राहिल्याने त्यांनी ती मिळण्यासाठी विनंती केली. नवीन आयपीओसाठी आणखी 90 लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ते भरण्यास नकार दिला आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
