| पनवेल | वार्ताहर |
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सोशल मीडियावरील फसव्या आमिषाला बळी पडून नागरिकांवर आपल्याकडील मौल्यवान ऐवज व रोकड गमावल्यानंतर डोक्यावर हात देण्याची वेळ येते. अशाच स्वरूपाची घटना पनवेलमधील एका तरुणाच्या बाबतीत घडली घडली आहे. यात टेलिग्राम फ्रॉडच्या या प्रकारातून केतन रघुनाथ पाटील नावाच्या तरुणाची तब्बल 10 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतन रघुनाथ पाटील (37) असे पीडित तरुणाचे नाव असून, तो पनवेल येथील रहिवासी आहे, याने फिर्याद दिली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. आरोपी इंदिरा (व्हॉट्स नंबरवरून ओळखले गेलेले नाव), टेलिग्राम आयडी प्रोफेसर 1223 असलेली व्यक्ती, टेलिग्राम आयडी रवींद्र व्यक्ती या फसवणूक योजनेतील सिंग सहोता असलेली दुसरी आणि टेलिग्राम आयडी अनिका चोप्रा असलेली तिसरी व्यक्ती आहेत.
या फसवणूक प्रकरणात गुंतवलेली एकूण रक्कम 10 लाख 13 हजार 5 इतकी आहे. यातील आरोपीने सदर तरूणाशी संपर्क साधला आणि त्याला ऑनलाइन प्रीपेड काम करण्याचे आमिष दाखवले. आणि त्यांनी त्याला दुवे पाठवले व यानंतर काम नियुक्त करून आकर्षक परताव्याचे आश्वासनही त्यास देण्यात आले. त्यानंतर तरूणाची उपरोक्त रकमेची फसवणूक झाली. तथापि, कार्य पूर्ण केल्यानंतर, पीडितेला वचन दिलेला परतावा किंवा पैसे दिले गेले नाहीत. दरम्यान, यातील तरूणाने पैसे भरण्यासाठी आरोपींशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व सहकार्य न मिळाल्याने हताश झालेल्या तरूणाने अखेरीस पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.