| पनवेल | वृत्तसंस्था |
खांदेश्वर येथील एका 45 वर्षीय अभियंत्याची 15 लाख रुपयांची फसवणूक ऑनलाईन गुंवतणूकीद्वारे झाली. जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान ही फसवणूक झाली आहे. जानेवारी महिन्यातया अभियंत्याच्या मोबाईलवरील टेलिग्राम अॅपवर फ्यूचर फोरच्युन ग्लोबल या खात्यावर फोरेक्स ट्रेडींगची माहिती मिळाली. विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी संबंधित अभियंत्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये पाठवले. गुंतवणूकीमध्ये लाभ झाल्याने या अभियंत्याने विविध 10 बँकांच्या खात्यामध्ये 15 लाख 6 हजार 657 रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसात अभियंत्याला त्याची फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.