लाखो रुपयांची फसवणूक

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सिम कार्ड बंद करून ते डुप्लिकेट काढून त्याचा वापर करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून सहा लाख 76 हजार रुपये परवानगीशिवाय दुसर्‍या बँक खात्यात वळती करून फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेंद्र अनंत गोजे हे आरीवली, पनवेल येथे राहात असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांना समोरील इसमाने फोन करून फोरजीची सुविधा फाईव्ह जी मध्ये करून देतो, असे सांगितले. त्यावेळी नंतर बोलू असे गोजे यांनी सांगितले असता दहा-पंधरा मिनिटांनी त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यांनी गॅलरीत जाऊन चौकशी केली असता आधार कार्डच्या बायोमेट्रिक लॉक असून, ते चालू झाल्याशिवाय मोबाईल चालू होणार नाही असे कळले. त्यांनी आधार कार्ड जाऊन अपडेट केले. त्यांना ट्रान्सपोर्टचे कामाकरता पेमेंट करायचे असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र पनवेल शाखेत गेले. या ठिकाणी जमा शिल्लकबाबत चौकशी केली असता बँक खात्यातून सहा लाख 76 हजार रुपये अज्ञात बँक खात्यावर वळते झाल्याचे कळाले. यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात व्यक्तीने पुन्हा फोन करून ब्रांच मॅनेजर बोलत असल्याचे सांगून काही रक्कम पुन्हा बँक खात्यावर टाकण्यास सांगितली. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती रक्कम टाकलेली नाही.

Exit mobile version