। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
ट्रेंडिंगच्या नावाने 14 लाख 10 हजार रुपये घेऊन रक्कम परत न करता ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात 8 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
63 वर्षीय जेष्ठ नागरिक तेजेंद्रनाथ गर्ग हे कामोठे येथे राहत असून, त्यांना फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची यासाठी तिने त्यांना व्हॉट्सॲप नंबर दिला. यावेळी त्या महिलेने मी जिथे गुंतवणूक करते त्या ॲपमध्ये गुंतवणूक करून बघा, रोज पाच टक्क्यांपर्यंत नफा होईल असा मेसेज केला. लिंक पाठवली असता त्यात अकाउंट उघडले आणि पैसे गुंतवणूक केले. त्यानंतर त्यांनी आणखी पैसे जमा केले. पैसे काढण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली असता ती रिक्वेस्ट स्वीकारण्यात आली नाही आणि पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. ॲप मधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला मात्र रक्कम काढण्यास परवानगी दिली नाही आणि चौदा लाख दहा हजारांची फसवणूक केली.







