मंडळ अधिकार्‍यासह तलाठ्याने लावला दिड कोटीचा चुना


बनावट कागदपत्र प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खरेदीदाराच्या नावाचे मुळ कागदपत्र काढुन त्याजागी खोटे बनावट कागदपत्र दस्तास लावून 1 कोटी 42 लाख 82 हजार रुपयाचीं फसवणूक करणार्‍या मंडळ अधिकारी व तलाठ्यासह सात आरोपींविरुध्द अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग येथील सबरजिस्टर ऑफीस येथे 7 आरोपींनी संगनमत करुन जमिन व्यवहाराबाबत फिर्यादी रा. पेण ता. पेण यांचा विश्‍वास संपादन करुन प्रणया समाधान पाटील यांच्या खरेदीदाराच्या नावाचे मुळ कागदपत्र काढुन त्याजागी आरोपीपैकी एकाच्या नावाची खोटे व बनावट कागदपत्र दस्तात लावुन सदर मिळकतीतील क्षेत्र त्याच्या नावाने रजिस्ट्रेशन करुन प्रति गुंठा 6 लाख 30 हजार 000/- रूपये प्रमाणे 1 कोटी 42 लाख 82 हजार रकमेची फसवणुक केली. तसेच सदर कागदपत्रांची खात्री न करता आरोपीच्या नावानी सातबारा तयार केला म्हणून मंडळ अधिकारी व अलिबाग तलाठी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 102/2021 भा.दं.वि.क. 420, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे हे करीत आहेत.

Exit mobile version