खोटे सोने देऊन दहा लाखांची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।
खोट्या सोन्याचा गुच्छा देत दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुईस कोलासो यांचे नीक ऑप्टिशियन नावाने चष्म्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात राजू नावाची व्यक्ती दोन-तीन वेळा चष्मा विकत घेण्यासाठी आली होती. त्यानंतर राजू परत दुकानात आला व त्याच्याकडे काही सोने असून, त्याला ते विकायचे आहे, असे त्याने सांगितले. यावेळी लुईस यांनी होकार दिला. राजूने दुसर्‍या दिवशी सोन्याच्या हाराचा गुच्छा आणला व त्यातील मणी काढून ते तपासून घेण्यास सांगितले. ते मणी खरे असल्याचे सोनाराने सांगितले. त्यानंतर दहा लाख रुपये राजूला दिले व सोन्याच्या हाराचा गुच्छा घेतला. दुसर्‍या दिवशी ते सोनाराकडे गेले असता ते खोटे सोने असल्याचे समजले.

Exit mobile version