। पनवेल । वार्ताहर ।
स्पा व्यवसाय चालविणार्या महिलेकडे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिच्याकडे खंडणीची मागणी करून न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवुन तिचा विनयभंग करणारा तोतया पोलीस अधिकारी इसमास खारघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तशी वेशभूषा करून तक्रारदार महिलेचे ब्यूटी पार्लर व स्पाचे दुकान चाल ठेवणेकरीता दरमहा 2 हजार रूपये प्रमाणे रोख व गुगल पेन्दारे रक्कम स्विकारून लॉकडाउन काळात पैसे दिले नाहीत म्हणून महिलेस शिवीगाळी करून, जिवे मारून टाकण्याची धमकी देवून तसेच कारमध्ये सदर महिलेशी केलेले विनयभंगाचे कृत्य आरोपीने मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करून व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या मोबदल्यात 1 लाख रूपयाची मागणी करून ते न दिल्याने सदरचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर व्हायरल केल्याने याबाबतची तक्रार सदर महिलेने खारघर पोलीस ठाण्यात दिली. त्याप्रमाणे पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह, सह. पोलीस आयुक्त जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, परिमंडळ 2, पनवेल, भागवत सोनावणे, सहा पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाणेकडील वपोनि संदीपान शिंदे, मपोनि विमल बिडवे, सपोनि मानसिंग पाटील, पोहवा वैद्य, पोना धनवटे, पोना चौधरी, पोना पाटील व पथकाने सदर आरोपीला पकडले. अटक गुर्शिदप्पा अंबादास वाघमारे याच्या विरोधात मुंबईत सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे एकंदरीत आठ गुन्हे त्यासह अदखलपात्र 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.महिला वर्गाने अशा प्रकारे फसवणूक करणार्या व्यक्तींविरोधात पुढे येवून जवळच्या पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार करावी. निश्चितच त्यांच्या नावाची गुप्तता ठेवून अशा व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येईल. – शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त.