बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यात तोतया माणूस उभा करून जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची घटना घडली असून, 13 जणांविरोधात याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सुष्मा बाजीराव कदम आणि आरोपी बळीराम रामचंद्र कदम (76) धंदा-शेती, रा. मुंबई, गजानन रामचंद्र कदम (63) धंदा-शेती, रा. वावे दिवाळी, ता. माणगाव, दिलीप हनुमंत कदम (66) धंदा- शेती, रा. चिंचवळीवाडी पो. गोरेगाव, प्रवीण हनुमंत कदम (63) धंदा-शेती रा. वावे दिवाळी, संदेश हणुमंत कदम (51) धंदा- शेती, रा. वावे दिवाळी, अपर्णा प्रफुल खुटवळ (54) धंदा- शेती रा. गोरेगाव, अनिता अनंत कापरे (69) धंदा- शेती रा. दमखाडी ता. रोहा, सुहासिनी भरत चव्हाण (54) धंदा- शेती रा. राणेची वाडी, ता. तळा, हणुमंत कदम, विश्वास उल्हास कदम (40) धंदा शेती, रा. वावे दिवाळी, विश्वजीत विष्णू जाधव उतेखोल, प्रदीप गजानन भोईर, रा. उरण, अनिकेत अनंत पाटील, रा. उरण, अज्ञात इसमांपैकी फिर्यादी आणि आरोपी क्र 1 ते 8 यांची मौजे वावे दिवाळी येथील जमिन मिळकती सर्वे नं.16, 350/1,58 या सामायिक जमिन मिळकती आहेत. फिर्यादी यांचे पती हे मयत असून, सदर मिळकतीवर 7/12 पत्रकी महसुल दप्तरी दाखल आहेत.

सदर मिळकतीवर नमूद असलेले अरुण हनुमंत कदम ही व्यक्ती गेली 25 वर्षे बेपत्ता आहे. तरी ही दि.26 फेब्रुवारी 2021 रोजी वरील तेरा इसमांनी संगनमत करुन फिर्यादीला काहीही माहिती पडून न देता अरुण हणुमंत कदम ही व्यक्ती गेली 25 वर्षे बेपत्ता आहे. याच्या ठिकाणी बोगस आधारकार्ड बनवून आरोपी क्र. 1 ते 13 यांनी संगनमत करून तिऱ्हाईत व्यक्तीस उभे केले आणि अखत्यारपत्र दस्त क्र. 734/2021 मे दुय्यम निबंधक कार्यालय, माणगाव येथे आरोपींनी स्वत:च्या लाभात नोंदणीकृत करून घेतले म्हणून फिर्यादी यांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. अस्मिता पाटील करीत आहेत.

Exit mobile version