। पनवेल । वार्ताहर ।
इंटरनेट बँकींगद्वारे 1 लाख 94 हजार 700 रुपयाची ऑनलाईन फसवणूक एका महिलेची झाल्याची घटना तालुक्यातील अजिवली येथे घडली आहे.
अजिवली येथील अमेटी युनिर्व्हसिटी येथे असलेल्या एका महिलेला सुमित या नावाने मोबाईलवर फोन आला व त्याने शाईन डॉट कॉमवरुन बोलत असल्याचे सांगून यापूर्वी जुलै 2021 मध्ये तुम्ही जॉबसाठी भरलेले पैसे परत करावयाचे आहे असे सांगून त्यांना युआरएल वर पेज ओपन करून त्यावर त्यांची तक्रार नोंदविण्यास सांगून इंटरनेट बँकींगद्वारे 10 रुपये भरण्यास सांगून सदर 10 रुपये भरले असता बर्र्या वेळाने ओटीपी आल्याने सुमित याने सदर महिलेच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजचा स्क्रिन शॉट पाठविण्यास सांगून सदर स्क्रिट शॉट पाठविल्यानंतर त्या महिलेच्या अकाऊंटमधून दोन वेळा ट्रान्झेक्शनद्वारे एकूण 1 लाख 94 हजार 700 रुपये ऑनलाईन फसवणूक झाल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.
इंटरनेट बँकींगद्वारे फसवणूक
