ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याचे आमिष दाखवून एक लाख 42 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुचित राजेशकुमार गझीवाला यांना दोन तासांसाठी पाच हजार रुपये ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली तर 20 हजार रुपये भेटतील, असा संदेश पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर गझीवाला यांनी त्वरित पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या रकमेचा 20 हजारांचा परतावा घेण्यासाठी खाते खोला, असे त्यांना सांगण्यात आले. पुढे त्यांना कमिशन पे, जीएसटी, एक्स्पर्ट क्लिअरन्स व पेंडिंग चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एक लाख 42 हजार 214 रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना परतावा दिला नाही. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गझीवाला यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version