एटीएमद्वारे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

एटीएमद्वारे 20 हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू नरळे हे पळस्पे गावात राहतात. ते एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, पैसे न आल्याने एटीएमच्या बाहेर थांबलेला एकाने मदतीच्या बहाण्याने त्यांचा पीन घेतला. मात्र, पैसे आलेच नाही. नरळे बाहेर गेल्यावर थोड्यावेळाने त्यांचा बँक खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज आले. त्यांनी एटीएम कार्ड पाहिले असता, ते दुसरेच कार्ड होते. त्यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढण्यात आले होते.

Exit mobile version