। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
जे बी फिटनेस जिममध्ये येणाऱ्या जिम मेंबरची फीची रक्कम परस्पर स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आशिष राजू पवार रा. आदई याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात दहा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
जयश्री बोरणारे यांचा जे बी फिटनेस नावाने जिमचा व्यवसाय नवीन पनवेल सेक्टर 6 येथे आहे. त्या ठिकाणी आशिष राजू पवार हा ट्रेनर आहे. तो जीम मेंबरची फी भरून घेत असे. नोव्हेंबर महिन्यात जिमचे बॅलन्स पेमेंट तपासून पाहत असताना जिम मेंबरची फी बाकी असल्याचे जयश्री यांना दिसले. आणि बँक स्टेटमेंट व जिममध्ये असणारे चालू जिममेंबर यांच्यामध्ये तफावत दिसून आली. त्यानंतर आशिष पवार यांनी नोकरी सोडत असल्याचे सांगितले आणि कामावर येणे बंद केले. त्यानंतर एका जिम मेंबरने जयश्री यांना तीन महिन्याच्या पॅकेजमध्ये वार्षिक पॅकेज आशिष यांनी दिली असल्याचे सांगितले आणि ते पैसे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यांनी जिम मधील बुकांची पडताळणी केली असता अनुक्रमांक मध्ये बदल केल्याचे दिसले आणि जिमच्या रेट कार्ड प्रमाणे पैसे घेतलेले दिसून आले नाहीत. अशी एकूण पाच लाख दहा हजारांची फसवणूक केली.







