| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडच्या लायन्स क्लबतर्फे डॉ. सुंदरलाल आणि सुवर्ण बहल फाउंडेशन फोर्ट मुंबई यांच्या सौजन्याने द्वारकानाथ कर्णिक यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या हस्ते मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. सुरुवातीला लायन नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. लायन्स क्लबतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग ब्लँकेट वाटप असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लायन्स क्लब मुरुडचे खजिनदार मकरंद कर्णिक, ला.नैनीता कर्णिक, ला.सायली गुंजाळ, ला. नयन कर्णिक यांच्या हस्ते मुरुडमधील 25 गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुईली गुंजाळ यांनी मोलाचे सहकार्य केले, तर ला.सायली गुंजाळ यांनी आभार मानले.







