विनामूल्य करिअर मार्गदर्शन

। उरण । वार्ताहर ।

दहावी आणि बारावी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पुढील भविष्यासाठी योग्य असे विनामूल्य करियर विषयक मार्गदर्शन मिळावे या अनुषंगाने नागाव म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन शिबीर माउली मंगल कार्यालय, भोईवाडी, नागाव रोड, म्हातवली उरण येथे आयोजित करण्यात आले.

दहावी आणि बारावीनंतर विदयार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे, शासकीय निमशासकीय विभागातील नोकरीच्या संधी. स्वयंरोजगार, उद्योग, विविध कोर्स व त्याचे फायदे, एमपीएससी , यूपीएससी स्पर्धा परिक्षेची माहिती, केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ? अभ्यास कसा करावा ? आदी सविस्तर अगदी सोप्या भाषेत माहिती करिअर मार्गदर्शक सूहास पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना दिली.उपस्थित विद्यार्थ्यांनी सुध्दा वेगवेगळे प्रश्‍न विचारले होते त्याचे समाधानकारक उत्तर सुहास पाटील यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्‍नाचे सुहास पाटील यांनी उत्तम प्रकारे निरसन केले. सदर कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गासोबत पालकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. करियर मार्गदर्शनानंतर शेवटी दहावी व बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चांगल्या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याने सदर कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी व पालकांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रवीण घरत यांनी तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी ॲड.अरुण थळी यांनी केले.

सदर कार्यक्रमामासाठी डि.के. भोईर यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागाव म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घरत, उपाध्यक्ष माधव बिश्‍वास, सेक्रेटरी अरुण थळी, सल्लागार महेंद्र म्हात्रे, खजिनदार अरुण पाटील, सदस्य विकास माळी, रमेश नाईक, हितेंद्र म्हात्रे, एच पी कडू, नरेंद्र गायकवाड, गजानन म्हात्रे तसेच इतर सर्व संस्थेच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version