कुलाबा किल्ल्यात मोफत प्रवेश

| रायगड | प्रतिनिधी ।

माघी गणेशोत्सवानिमित्ताने कुलाबा किल्ल्यात भाविकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने भाविकांसाठी प्रवेश शुल्क माफ केले आहे. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यात सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. बाप्पाच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येणार आहे. अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे कुलाबा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येते. 15 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीकडून 25 रुपये प्रवेश शुल्क पुरातत्व विभाग आकारते. मात्र, उत्सवाच्या दिवशी या शुल्कातून भाविकांना सूट देण्यात येते.

Exit mobile version