। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील लायन्स क्लब आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन तसेच श्री साई सिद्दी संस्थान खंडाळेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने संपन्न झालेल्या या शिबिरात परिसरातील खंडाळे, वाडगाव, कार्ले, वेश्वी ते कुरुळ, वायशेत, मिळकतखारपर्यंच्या नेत्ररुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्यांवर उपचार आणि काळजी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरात साधारण सत्तर नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 9, रेटिना 5 आणि एकाला लेझर यागसाठी संदर्भित करण्यात आले.
यावेळी लायन्स अलिबाग प्रेसिडेंट अॅड गौरी म्हात्रे, सेक्रेटरी महेश कवळे, ट्रेझरर अंकिता म्हात्रे, जॉईंट सेक्रेटरी नितीन शेडगे, सर्व लायन अनिल म्हात्रे, नयन कवळे, प्रदीप नाईक, महेंद्र पाटील, गिरीश म्हात्रे, महेश चव्हाण, अभिजित आमले, परेश भतेजा यांच्यासह देवस्थानचे मुख्य ट्रस्टी प्रकाश पानसरे, लायन्स हेल्थ फाउंडेशनचे डॉ. सागर कदम, डॉ. तन्मयी पुरी, नेत्रतज्ज्ञ ऋतुजा बेडेकर, प्रतीक कणसे, सुजित पाटील, अचल राऊत आदी उपस्थित होते.