मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्यातर्फे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर बुधवार, दि.12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत जुने एसटी स्टँड माणगावजवळ वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांच्या बाजूला असणाऱ्या महेंद्र पितांबर मेथा यांच्या प्रशस्त जागेत हॉलमध्ये घेण्यात येईल. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरीब गरजू लोकांनी घ्यावा, असे आवाहन माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेथा परिवारातर्फे विजयशेठ मेथा, मनीष मेथा, विधिता मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल टीम परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version