कुर्डूस येथे नेत्रतपासणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब पोयनाड आणि ज्येष्ठ नागरिक संस्था कुर्डूस विभागाच्या संयुक्त विद्यमाने व लायन्स हेल्प फाउंडेशन चोंढी-अलिबाग यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 25 मोतीबिंदू रुग्ण आढळले असून त्यांच्यावर लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चोंढी येथील डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येऊन मोतीबिंदू मुक्त करण्यात येणार आहे.

लायन्स क्लब पोयनाडच्या पुढाकाराने गुरूवारी (दि.25) कुर्डूस येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या लायन्स क्लब पोयनाडचे विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात लायन्स क्लब पोयनाडच्या विविध उपक्रमांबाबत आणि प्रामुख्याने नेत्र शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिये संदर्भात माहिती दिली. 2023-24 या वर्षात आतापर्यंत 179 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामान्य नेत्ररुग्णांना नवी दृष्टी देण्याचे कार्य व त्याचबरोबर सर्वसामान्यांचे खर्चात बचत करण्याचे काम ही सामाजिक संस्था करीत असल्याचे प्रतिपादनही विकास पाटील यांनी केले. शिबिर यशस्वी करण्याकरता यशवंत पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, जनार्दन पाटील, वनिता पिंगळे, नंदा पिंगळे, बबन पिंगळे, सखाराम पाटील, चंद्रकांत म्हात्रे, बांधणकर, प्रदीप सिनकर, प्रमोद पाटील, विकास पाटील या सर्वांच्या प्रयत्नांनी हे शिबीर यशस्वी झाले.

Exit mobile version