वळवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

श्री द्वारकाधीश ग्रामस्थ मंडळ, वळवली आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री द्वारकाधीश उत्सवानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन सोमवारी (दि.27) सकाळी 9.30 ते 3 वाजेपर्यंत श्री द्वारकाधीश मंदीर, वळवली येथे करण्यात आले आहे.

मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या रुग्णांनी येताना सोबत आधारकार्ड व रेशनकार्डची छायांकित प्रत घेऊन यावी. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा अल्पदरात देण्यात येणार आहे. मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास तीदेखील घेऊन यावी. मोतिबिंदू झालेल्या रुग्णांना पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येईल. तरी, गरीब व गरजू लोकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भालचंद्र पाटील 9373843781 यांच्याशी संपर्क करावा.

तसेच सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक व पूजा होणार असून त्यानंतर 10 वाजत भागवत धर्म प्रसारक ह.भ.प.श्री. विश्वनाथ रामचंद्र यांचे भक्ती रसपूर्ण प्रवचन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेण्याचा व रात्रौ 9 वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीत सहभाग घेण्याचे आवाहन श्री द्वारकाधीश ग्रामस्थ मंडळ, वळवली यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version