। पनवेल । प्रतिनिधी ।
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या पुढाकाराने नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था यांच्या माध्यमातून साइट सेव्हर्स इंडिया यांच्या राही या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतामध्ये जड वाहतूक करणार्या चालकांसाठी नॅशनल ट्रकर्स प्रोग्राम च्या अंतर्गत कोपर, तालुका उरण येथे डोळ्यांची मोफत तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगर जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्था यांच्या पुढाकाराने पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. ज्या वाहनचालकांना चष्मा आवश्यक आहे, त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे डॉ. संतोषकुमार नायर यांच्या मेडिकल टीम अंतर्गत डॉ. प्रियंका रावराणे, कॅम्प कॉर्डिनेटर मनस्वी भिंगार्डे, ओप्टोम स्नेहा पाटील, ओप्टोम आनंदी नाडार, कॅम्प कॉर्डिनेटर प्रशांत गायकवाड तसेच जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मंगेश अपराज, आकाश पाटील, प्रशांत कोळी उपस्थित होते.