विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

लायन्स क्लब ऑफ खोपोलीचा स्तुत्य उपक्रम

| खोपोली | प्रतिनिधी |

डोळ्यांसंबंधी तक्रारी, मोतीबिंदू हे फक्त मोठ्यांना तसेच वयाच्या चाळीशी पार केलेल्या लोकांनाच असतात, असा सर्वांचा समज असतो. मात्र, लायन्स क्लब ऑफ खोपोलीतर्फे शाळकरी विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बऱ्याच लहान मुलांना डोळ्यांसंबंधी तक्रारी तसेच मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारी लायन्स क्लब ऑफ खोपोली, झुनझुनवाला आय हॉस्पिटल आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राम हरी धोटे शिशु मंदिर इंग्लिश मीडियम शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीनंतर विविध प्रकारच्या तक्रारींवरील उपचार शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहेत.

या शिबिराप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अतिक खोत, शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका झांसी टीचर, प्रकल्प प्रमुख ला. अल्पेश शहा, ला. दिलीप पोरवाल, सचिव ला. दिपाली टेलर, खजिनदार ला. निजामुद्दीन जळगावकर, माजी अध्यक्षा ला. शिल्पा मोदी, संगीता पिल्ले, अनुराधा कट्टी, जितेंद्र परदेसी, शैली मेहता, ला. विकास नाईक, शाळांमधील सर्व कर्मचारी, शंकरा हॉस्पिटलच्या कर्मचारी उपस्थित होते. तर शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबीर होत असल्याबद्दल पालकवर्गातून लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे कौतुक होत आहे.

Exit mobile version