लायन्स क्बलच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा, लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, समता फाऊंडेशन मुंबईचे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोलाड उपसरंपच सानवी बाईत व ग्रामस्थ मंडळ महादेववाडी यांच्या सहकार्यातून महादेवाडी (बाईतवाडी) मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात 105 रुग्णांची तपासणी, तर 13 रुग्णांवर मोफत नेत्रचिकित्सा केली जाणार आहे.

कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर सानप व मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या शिबिरात यावेळी नरेश बिरगावले, डॉ विनोद गांधी, रविंद्र लोखंडे,डॉ श्याम लोखंडे, नंदकुमार कलमकर,राजेंदर कोप्पू,विश्‍वास निकम, डॉ केरकर आणि टीम,डॉ गांधी नर्सिंग होम तथा सपना पॅथॉलॉजीच्या मोनिका आणि नूतन ,श्रुती ऑप्टिकल कोलाडचे विठ्ठल सावळे,आदी मान्यवर व ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version