जागतिक एड्स दिनानिमित्त किहीम येथे मोफत आरोग्य शिबीर

। अलिबाग । वार्ताहर ।
लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, रुरल यंग फाऊंडेशन तसेच तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.1) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने व जागतिक एड्स दिनानिमित्त किहीम आदिवासी वाडी येथे मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 130 लोकांची व लहान बालकांची सामान्य आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. सदरील लायन्स क्लब तसेच इतर सामाजिक संस्थांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विशेष कौतुक केले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित घासे, जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून डॉ. श्‍वेता कार्वेकर, डॉ. राजाराम हुलवान, स्वागता जैन, तसेच जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय माने व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होते. यावेळी डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्य बद्दल व निरोगी कसे रहायचे याबद्दल माहिती दिली. तर संजय माने यांनी एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर सर्वांना समजेल अशा भाषेत माहिती दिली. सुशील साईकर यांनी स्वच्छतेबद्दल निर्व्यसनी राहण्याबद्दल सांगितले. यावेळी अ‍ॅड डॉ. निहा राऊत यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

Exit mobile version