। खांब-रोहा । वार्ताहर ।
पनवेल हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत व कन्झुमर राईट्स ऑर्गनाईजेशन महाराष्ट्र आणि ग्रा.पं. निडी, ता. रोहा यांच्या वतीने रा.जि.प. प्राथमिक शाळा निडी येथे गुरूवार, दि.21 एप्रिल रोजी स.10 ते दु.2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदाब तपासणी, 50 वर्षांवरील रुग्णांसाठी मोफत मधुमेह तपासणी, गरजू रूग्णांसाठी ईसीजी तपासणी, स्त्रियांचे आरोग्य तपासणी, मुतखडा तपासणी, मुत्रपिंड, मुत्रमार्ग विकार, हाडांच्या शस्त्रक्रिया, न्युमोनिया, दमा व फुफ्फुसांचे आजार आदी आजारांबरोबर मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप आदींवर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, डॉ. सुरेश करांडे (एम.डी.), डॉ. आरती करांडे (बी.ए.एम.एस्), डॉ. फरीद चिमावकर आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येऊन मार्गदर्शन मिळणार आहे. तरी गरजू रुग्णांनी शिबिरात येताना पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशनकार्ड कार्ड, आधारकार्ड किंवा मतदान कार्ड व जुने रिपोर्ट तसेच मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी संजय भंडारी 9702258828 व रामदास घुले 9921308726 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.