। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत माजगाव, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत थर्ड प्लेनेट फांउंडेशन मर्क कारखाना बोरीवली यांच्या सौजन्याने सी.एस.आर फंड अंतर्गत महिला बचत गट अध्यक्ष, सचिव कमल जाधव यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजगाव, आंबिवली पौध, वारद या परिसरातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व्हावी, या उदात्त विचारांतून आंबिवली येथे कमल जाधव यांच्या निवासस्थानी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित लहान मुले, तरुण, वृद्ध यांनी रक्तदाब, शुगर, रक्त तपासणी, वजन, हिमोग्लोबिन, ऍनिमिया अशा अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधेही देण्यात आली. यावेळी उपस्थित रुग्णांना आरोग्यविषयी सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यात आले. बाहेरील अन्न पदार्थ खाण्यास शक्यता टाळावे व घरचे ताजे अन्न खावे, यामध्ये पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्ये यांचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये असावा, असा सल्ला उपस्थित रुग्णांना डॉक्टरांनी दिला. परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. यावेळी सरपंच, उप सरपंच, सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थ तसेच आरोग्य तपासणीसाठी मर्क येथील डॉ.अनुराधा कोठावडे, कल्याणी ठाकूर, पूजा मोरे, अनिल जाधव, सतीश रनिम, सुरज पाटील, अभिजीत कुरंगले आदी डॉक्टर उपस्थित होते.
आंबिवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
