| गडब | वार्ताहर |
चरी येथील हनुमान मंदिरााचे प्रांगणात नवरोत्रोउत्सवानिमित्त नारायण जाधव, चरी ग्रांमस्थ, संजिवनी हॉस्पीटल, शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सांध्याचे विकार, हुदयरोग, मणक्याचे विकार, संधीवात, श्वसनाचे विकार आदि आजारावर तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली, तर गर्भाशयाचे विकार व त्यावर उपाय या विषयी माहीती देण्यात आली. डोळ्याची तपासणीकरून मोफल चष्माचे वाटप सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांच्यातर्फे करण्यात आले. ज्यांची मोतिबिंदुची शस्रक्रिया करायची आहे त्याच्यावर संजिवनी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी आर. सी. माने, डॉ. निवेश म्हात्रे, डॉ.विजयकुमार जाधव, डॉ. किमया थळे, विधा जाधव, नारायण जाधव, मंगेश पाटील, सुनील थळे, रणजीत पाटील, महेश नाईक, महेंद्र म्हात्रे, नामदेव पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.