वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

| रसायनी | वार्ताहर |

मोहोपाडा नविन पोसरी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी प्रभारी सरपंच राकेश बाबुराव खारकर यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पोसरी हनुमान मंदिराच्या सभामंडपात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ यांच्यावतीने- मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, श्री साई ब्लड बॅक पनवेल यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबियन रक्तदाब, शुगर, ई.सी.जी, नेत्रतपासणी, तसेच आजार असणा-या नागरिकांना शस्त्रक्रिया आदीसह दहा नागरिकांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी,डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा 135 नागरिकांनी लाभ घेतला. यात दोघा रुग्णांना काहीअंश ह्दयाचा आजार,तर दोघांना कानाचा आजार,आठ रुग्णांना मोतिबिंदूचा आजार असल्याचे तपासणीत दिसून आले. त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी नेरुळ हॉस्पिटलात उपचार करण्यात येणार आहेत.तर रक्तदान शिबीरात 30 बाटल्यांचे संचलन करण्यात आले.यावेळी डॉक्टरांनी रग्णांना मोफत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. आदीक लोखंडे व स्टाफ टीममध्ये डॉ. अजित निले, रवि कदम, प्रविण शिरोडे, रोशनी कांबळे, पूजा जाधव, महेश गायकवाड, क्रांती यादव, फिरोज शेख, रजनी प्रजापती आदीं उपस्थित होते

Exit mobile version