आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचा उपक्रम

। उरण । वार्ताहर ।

अलीकडच्या काळात महिला, तरुणींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता त्यांना मार्शल आर्ट यासारख्या खेळाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या भल्याकरिता सदैव योगदान देणारे आदिवासी मित्र आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून चिरनेर येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट (कराटे) प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि स्वसंरक्षणा करिता राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील एकूण 255 विद्यार्थ्यांसोबत आंतरराष्ट्रीय कराटे कोच गोपाळ म्हात्रे, कराटे प्रशिक्षक रोहित घरत, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे, वैष्णवी मुंबईकर, स्नेहा तावडे आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version