परहुरमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण

| अलिबाग | प्रतिनिधी |

परहुर ग्रामपंचायत आणि जय शोतोकान कराटे अँड स्पोर्ट अकॅडमी रायगड यांच्या सौजन्याने परहूर ग्रामपंचायतीच्या मैदानावर दि.15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मुलींची संख्या जास्त होती. 58 मुली होत्या तर तीस मुले होते अशी एकूण 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कराटे संस्थेचे भारताचे मुख्य प्रशिक्षक सिहान परमजीत सिंग ठाणे, संतोष कवळे, प्रथमेश पाटील, रोहन गुरव, वेदिका कवळे, सोनू कामी , हेमा कामी यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण देण्यात आले.

Exit mobile version