| खांब | प्रतिनिधी |
दीपक फाउंडेशन रोहा यांच्या वतीने नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थी वर्गाची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दीपक फाउंडेशन रोहा व दीपक नायट्रेट कंपनी धाटाव यांच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेषतः गरजू रूग्णांसाठी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराचा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून हाती घेतला आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दीपक फाउंडेशन रोहा व दीपक नायट्रेट कंपनी धाटाव यांच्या वतीने श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थी वर्गांची मोफत वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शारीरिक दोष आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. मुख्याध्यापक दीपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी वरिष्ठ प्रकल्प समन्वयक अजय आवाडे, डॉ.प्रियंका धनावडे, उत्कर्षा सरळेकर, अश्विनी म्हसकर, अंकिता ठाकूर, मारूती निगडे आदी दीपक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी
