कळंबोली येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर

| पनवेल | वार्ताहर |
मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे खा. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्यामार्फत मध्यवर्ती कार्यालय कळंबोली दि. 16 रोजी मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा कळंबोली व परिसरातील शेकडो महिला व पुरूषांनी लाभ घेतला. शिबिरादरम्यान सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत 100 पेक्षा जास्त मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, महानगर संघटक आबासो लकडे, शहर प्रमुख तुकाराम सरक, रोडपाली शहर अध्यक्ष नारायण फडतरे, विभाग संघटक सुखदेव सस्ते रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके,संजय शेडगे,महेश गोडसे,निलेश दिसले, आनंदा माने, रणजित फडतरे,शुभम गोडसे,नारायण पिलाणे, विजय जाधव, गणेश कामटे,सुधीर ठोंबरे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version