रायगड हॉस्पिटमध्ये गरिबांवर मोफत उपचार

शासनाच्या आरोग्य योजनांचा मिळणार लाभ
| नेरळ | वार्ताहर |

रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आता गरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. त्यामुळे आता पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक यांना रुग्णालयात कोणत्याही शस्त्रक्रिया आणि उपचार घेण्यासाठी कोणताही पैसे खर्च होणार नाही.

दरम्यान, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तसेच मावळ तालुक्यातील रुग्णांनी या सरकारी योजना यांचा लाभ घेऊन उपचार करून घेण्यासाठी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांना संधी द्यावी, असे आवाहन रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मेडिकल कॉलेज सुरु झाले आहे. 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे रायगड हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवी डॉक्टर आणि मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यंसाठी अनुभवी अद्यापक वर्ग सेवेत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून या हॉस्पिटलकडून तालुक्यातील गावोगावी आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. रायगड हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव केला आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वार्षिक एक लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्याना पाच लाखांचा विमा दिला जात आहे.

रुग्णाकडे आवश्यक कागदपत्र
कागदपत्रे आवश्यक पिवळे, केशरी, अंत्योदय योजना शिधापत्रिका, रहिवास पुरावा आधारकार्ड, दारिद्य्रेषेखालील यादीतील नावांची माहिती आदी कागदपत्रे.

योजनेसाठी निकष
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला लाभार्थी यांना मोफत उपचारांची मुभा आहे. त्यासाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र किंवा 7058235753 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

रायगड हॉस्पिटल आणि तासगावकर वैद्यकीय महाविद्यालयमध्ये शासनाच्या आरोग्य योजना यांचा लाभ घ्यावा. आपल्या नातेवाईकांनादेखील माहिती देऊन अनुभवी डॉक्टरांचा लाभ घ्यावा, तसेच निरोगी महाराष्ट्र प्रगतशील राष्ट्र यासाठी करावा.

– डॉ. नंदकुमार तासगावकर, संस्थापक

रायगड हॉस्पिटलमध्ये शासनाच्या आरोग्य योजना यांचा लाभ मिळणार असल्याने रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी मोफत उपचार करून घ्यावेत.

– किशोर गायकवाड, रायगड भूषण
Exit mobile version