| उरण | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथील विद्यार्थ्यांना मनसे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी स्व खर्चाने मोफत गणवेश वाटप केले. या कार्यक्रमावेळी ॲड सत्यवान भगत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे चेअरमन तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड, पिरकोन गावचे माजी सरपंच रमाकांत जोशी, निवृत्त शिक्षक एम.डी. पाटील, अनिल पाटील, तुळशीदास पाटील, मोठी जुई मनसे शाखाध्यक्ष हर्षद भोपीसह विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.







