उरण शहरात 400 नागरिकांचे मोफत लसीकरण

उरण | वार्ताहर |
आ. महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरण शहरातील बापुशेठ वाडी, सातरहाटी, हरीपांडव पथ, देऊळवाडी, कामठा, कामगार वसाहत आणि आनंदनग, तसेच इतर विभागातील सर्व नागरिकांना मोफत कोवॅक्सीन व कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी 4 वाजेपर्यंत एनआय हायस्कूल उरण येथे पार पडला.
यावेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरेसवक कौशिक शाह, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेविका प्रियांका पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका दमयंती म्हात्र आदींचे सहकार्य मिळाले.

Exit mobile version